प्रेरणादायी नेतृत्व आणि प्रेक्षणीय फलंदाजी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमला सर रिचर्ड हॅडली पुरस्कार हा देशाच्या क्रिकेटमधील सर्वोच्च सन्मान देऊन गौरवण्यात आले.
३३ वर्षीय मॅक्क्युलमच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने प्रथमच विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. २९ मार्चला झालेल्या या सामन्यात मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाने त्यांचा सात विकेट्स राखून पराभव केला.
मॅक्क्युलमने विश्वचषक स्पध्रेत १८८.५०च्या सरासरीने नऊ सामन्यांत ३२८ धावा केल्या. त्याच्या नेतृत्वक्षमतेमुळे आयसीसीने आपल्या विश्वचषक संघाच्या कर्णधारपदीसुद्धा त्याची निवड केली होती.
केन विल्यमसनला फलंदाजीकरिता रेडपाथ चषक आणि ट्रेंट बोल्टला गोलंदाजीकरिता विन्सर चषक देण्यात आला. महिलामंध्ये सुझी बॅट्स हिला सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला. ट्वेन्टी-२०, कसोटी आणि एकदिवसीय खेळाडू म्हणून केन विलियम्सन याला गौरविण्यात
आले. तसेच स्थानिक स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंमध्ये अँडय़्रु  एलिस व अ‍ॅमी सॅटर्थवेट यांना
अनुक्रमे पुरुष व महिला गटासाठी गौरविण्यात आले.