News Flash

GREAT BRETT..! पॅट कमिन्सनंतर ब्रेट लीची भारताला ४२ लाखांची मदत

ब्रेट लीची क्रिप्टो रिलीफला देणगी

ब्रेट ली

भारतातील करोनाची स्थिती अत्यंत भयंकर होत चालली आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्सने या संकटावर मात करण्यासाठी ३७ लाखांची मदत केली. कमिन्सनंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीने मदतीचा हात पुढे केला आहे. लीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. कमिन्सने या कठीण काळात भारताला मदत करण्याची विनंती त्याच्या सहकाऱ्यांना केली होती. या आवाहनानंतर लीने भारताला मदत केली आहे.

ब्रेट लीची ट्विटरवर पोस्ट

आपल्या ट्विटरवर पोस्ट शेअर करताना ब्रेट लीने लिहिले, की भारत माझ्यासाठी नेहमीच दुसर्‍या घरासारखा आहे. माझी व्यावसायिक कारकीर्द आणि निवृत्तीनंतरही लोकांकडून मला मिळालेल्या प्रेमामुळे भारताचे माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे. लोक या साथीच्या आजारात ज्या प्रकारे संघर्ष करत आहेत, ते पाहून मला फार वाईट वाटले. पण, मी ज्या स्थानी आहे त्याचा मला आनंद आहे. कारण मी काहीतरी करू शकतो. मला क्रिप्टो रिलीफला एक बीटीसी (सुमारे ४२ लाख) रुपये देणगी द्यायची आहे, ज्यामुळे देशातील रुग्णालयांना ऑक्सिजनच्या पुरवठ्यात मदत होईल. ही एकत्र येण्याची वेळ आहे. आपण आपल्याला जमेल तितक्या गरजूंना मदत करू शकतो. या कठीण काळात काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचार्‍यांचे मी आभार मानू इच्छितो.”

 

”मी सर्व लोकांना विनंती करतो, की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी. घरात राहावे, हात चांगले धुवावेत आणि जेव्हा महत्त्वाचे असेल तेव्हाच बाहेर पडावे. मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे अनुसरण करा. पॅट कमिन्स, तू काल चांगली गोष्ट केलीस”, असेही लीने या पोस्टमध्ये सांगितले.

करोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे बर्‍याच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल २०२१मधून नावे मागे घेतली आहेत. अँड्र्यू टाय, अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन यांनी सध्याच्या मोसमातून आपली नावे मागे घेतली आहेत. झम्पा आणि रिचर्डसन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतात. ग्लेन मॅक्सवेल, डॅन ख्रिश्चन आणि डॅनियल सॅम्स हे आणखी तीन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहेत, जे आरसीबी संघाशी संलग्न आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 7:00 pm

Web Title: brett lee donates to crypto relief for purchase of oxygen supplies for indian hospitals adn 96
Next Stories
1 “…त्याशिवाय लीग संपणार नाही”, करोनाच्या उद्रेकात IPL सीओओचा खेळाडूंना ‘खास’ संदेश
2 DC vs RCB : रंगतदार सामन्यात बंगळुरूचा दिल्लीवर एका धावेने विजय
3 गावसकर म्हणतात, ‘KKRनं “या” जोडीला ओपनिंगला पाठवावं’
Just Now!
X