23 November 2017

News Flash

या फोटोसाठी सचिनने मानले ब्रेट लीचे आभार

खांद्यावर टॅटू काढणारा सचिनचा भन्नाट चाहता

लोकसत्ता टीम | Updated: September 13, 2017 10:15 AM

ब्रेट लीने इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला सचिनच्या चाहत्याचा फोटो

सचिन तेंडुलकरने आंतराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याच्या चाहत्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतच आहे. सचिनही सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानत असतो.

आपल्या अशाच एका चाहत्याला सचिनला भेटता आलं ते, ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ब्रेट लीच्या माध्यमातून. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आलेला आहे. यावेळी आपल्या खांद्यावर सचिनचा टॅटू गोंदवलेला एक चाहता ब्रेट लीच्या नजरेस पडला. ब्रेटने या चाहत्याचा फोटो तात्काळ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत सचिनला एक मेसेज दिला.

अवश्य वाचा – सहा वर्षाच्या चिमुरडीची मागणी वाचून सचिनही हसला

ज्याला सचिननेही तात्काळ उत्तर देत, ब्रेट लीचे आभार मानले आणि आपल्या चाहत्यालाही धन्यवाद म्हणलं.

मैदानात सचिन आणि ब्रेट ली यांच द्वंद्व आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. ब्रेट ने भारताविरुद्ध १२ कसोटींमध्ये ५३ बळी घेतले आहेत, तर ३२ वन-डे सामन्यांमध्ये भारताविरुद्ध खेळताना ब्रेट लीच्या खात्यावर ५५ बळी जमा आहेत. याचप्रमाणे सचिन तेंडुलकरचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना रेकॉर्डही उल्लेखनीय आहे. ३९ कसोटींमध्ये सचिनने ३६३० धावा केल्या असून, कांगारुंविरुद्ध सचिनच्या खात्यात ११ शतकं आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. वन-डे सामन्यांमध्ये सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७१ सामन्यांमध्ये ४४.५९ च्या सरासरीने ३०७७ धावा काढल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यांमध्ये सचिनने आपल्या कारकिर्दीत ९ शतकं झळकावली आहेत.

First Published on September 13, 2017 10:15 am

Web Title: brett lee shares picture of sachin fan on his social media account sachin reply back