ऑस्ट्रलिया दौऱ्यात एकापाठोपाठ एक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. रविंद्र, जाडेजा, आर. अश्विन आणि हनुमा विहारी यांना तिसऱ्या कसोटीत दुखापत झाल्यामुळे गाबा कसोटीला मुकावं लागलं आहे. त्यातच अखेरच्या कसोटी सामन्यात नवदीप सैनीलाही दुखापत झाल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ धाली आहे. वैयक्तीक ८ व्या षटकांतील अखेरचा चेंडू टाकताना नवदीप सैनीला दुखापत झाली. स्नायू दुखावल्यामुळे ३६ व्या षटकातील पाचव्या चेंडूनंतर अर्ध्यातच मैदान सौडून सैनी तंबूत परतला. त्यानंतर उर्वरीत एक चेंडू रोहित शर्मानं टाकला.

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत एकापाठोपाठ एक खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागत आहे. जवळपास १३ भारतीय खेळाडूंना दुखापत झाली आहे. निर्णायक कसोटी सामन्यात गोलंदाजी करताना सैनीचे स्नायू दुखावले गेले. त्यामुळे त्यानं अर्ध्यातूनच मैदान सोडलं. थोड्यावेळ विश्रांती घेतल्यानंतर ४० व्या षटकांत सैनी मैदानावर परतला आहे. मात्र, त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप काहीही समोर आलेलं नाही. सैनीची दुखापत गंभीर असल्यास भारतीय संघाच्या अडचणीत भर पडू शकते.

Video : पृथ्वी शॉनं थ्रो केलेला चेंडू थेट रोहितच्या हातावर आदळला, अन्…

दुखापतग्रस्त होण्यापूर्वी सैनीच्या चेंडूवर मार्नस लाबुशेनला जीवनदान मिळालं. सैनीचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाबुशेनला गलीमध्ये उभा उसणाऱ्या रहाणेकरवी जीवनदान मिळालं आहे.

आणखी वाचा- कांगारुंच्या तोफखान्यासमोर टीम इंडियाची गोलंदाजी दुबळीच; पाहा आकडेवारी

दुखापतीमुळे संघाबाहेर असणारे प्रमुख भारतीय खेळाडू –
इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, केएल राहुल, रविचंद्रन अश्विन, हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह