रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी-20 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंडिया लेजेंड्सकडून 60 धावांची स्फोटक खेळी करणाऱ्या युवराज सिंगने सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ‘गार्ड ऑफ हॉनर’ देऊन युवराजला मानवंदना दिली. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात इंडिया लेजेंड्सने श्रीलंका लेजेंड्सला 14 धावांनी पराभूत करून विजेतेपद जिंकले. या विजयात युवराजने महत्त्वपूर्ण योगदान दिले.

मोडलेला बाहुबली

या सामन्यानंतर इंडिया लेजेंड्सचा संघ मेफेयर हॉटेल अँड रिसॉर्ट येथे पोहोचला. त्यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी युवराजने अभिनंदन केले. युवीनेही ‘गार्ड ऑफ हॉनर’चा सन्मान स्वीकारत त्यांच्यात एक भन्नाट डान्स केला. या व्हिडिओमध्ये बाहुबली चित्रपटाचे गाणे वाजत आहे. विशेष म्हणजे पायाला प्लास्टर असतानाही युवराज या गाण्यावर थिरकताना दिसला. या व्हिडिओला त्याने ”मोडलेला बाहुबली (ब्रोकन बाहुबली)”, असे म्हटले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंडिया लेजेंड्सने 4 विकेट्सच्या मोबदल्यात 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळणारा श्रीलंका लेजेंड्सचा 20 षटकांत 7 बाद 167 धावापर्यंतच पोहोचू शकला. युवराजने 41 चेंडूंत 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक

भारत लेजेंड्स: 20 षटकांत 4 बाद 181 (युसूफ पठाण नाबाद 62, युवराज सिंग 60; रंगना हेराथ 1/11) विजयी वि. श्रीलंका लेजेंड्स: 20 षटकांत 7 बाद 167 (सनथ जयसूर्या 43, चिंतका जयसिंघे 40; युसूफ पठाण 2/26, इरफान पठाण 2/29).