18 September 2020

News Flash

ब्रायन बंधू अजिंक्य

अमेरिकेच्या माइक आणि बॉब ब्रायन बंधूनी फ्रेंच खुल्या स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या जेतेपदावर नाव कोरले. ब्रायन जोडीचे पुरुष दुहेरीचे हे विक्रमी १४वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. ब्रायन

| June 10, 2013 03:11 am

अमेरिकेच्या माइक आणि बॉब ब्रायन बंधूनी फ्रेंच खुल्या स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या जेतेपदावर नाव कोरले. ब्रायन जोडीचे पुरुष दुहेरीचे हे विक्रमी १४वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. ब्रायन जोडीने फ्रान्सच्या मायकेल लोइड्रा आणि निकोलस माहुत जोडीचा ६-४, ४-६, ७-६ (४) असा पराभव केला. टायब्रेकरमध्ये पिछाडीवर पडलेल्या ब्रायन जोडीने शानदार पुनरागमन करत तिसऱ्या सेटसह जेतेपदावर कब्जा केला. या जोडीने याआधी २००३ मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. लोइड्रा आणि माहुत या स्थानिक जोडीला प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा होता, मात्र ब्रायन जोडीने आपल्या अनुभवाला साजेसा खेळ करत विजयाची नोंद केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2013 3:11 am

Web Title: bryan brothers unbeatable
Next Stories
1 ‘गौरव’ महाराष्ट्राचा!
2 श्रीकांत अजिंक्य
3 राजस्थान रॉयल्स आणि राज कुंद्रा यांचे भवितव्य अधांतरी
Just Now!
X