27 November 2020

News Flash

बुमरा, शमी यांना विश्रांती?

कसोटी मालिकेच्या तयारीसाठी ट्वेन्टी-२० लढतींना मुकण्याची शक्यता

(संग्रहित छायाचित्र)

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

भारताचे आघाडीचे दोन वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा आणि मोहम्मद शमी यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात येण्याची अथवा आलटून-पालटून संधी मिळण्याची शक्यता आहे. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेपूर्वी दोघांचाही लाल चेंडूद्वारे गोलंदाजीचा पुरेपूर सराव व्हावा, या हेतूने संघ व्यवस्थापन हा निर्णय घेऊ शकते.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. एकदिवसीय मालिकेनंतर उभय संघांत अनुक्रमे ४, ६ आणि ८ डिसेंबर रोजी तीन ट्वेन्टी-२० लढती खेळल्या जाणार आहेत. त्याशिवाय ६ ते ८ डिसेंबरदरम्यानच ऑस्ट्रेलिया एकादशविरुद्ध भारताचा तीनदिवसीय सराव सामना रंगणार आहे. त्यामुळे बुमरा-शमी यांची जोडी यांपैकी एकाच प्रकारात खेळताना दिसेल.

‘‘बुमरा आणि शमी दोघेही भारताच्या कसोटी संघाचे आधारस्तंभ आहेत. जर ते ट्वेन्टी-२० मालिकेत खेळले, तर त्यांना पहिल्या सराव सामन्याला मुकावे लागेल. मात्र कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे एक तर दोघांनाही या मालिकेसाठी विश्रांती देण्याच्या अथवा त्यांना आलटून पालटून संधी देण्याच्या विचारात संघ व्यवस्थापन आहे,’’ असे संघ व्यवस्थापनातीलच एका सदस्याने सांगितले. ११ ते १३ डिसेंबरदरम्यान गुलाबी चेंडूने सिडनी येथे दुसरा सराव सामना होणार आहे.

साहाचा सरावाला प्रारंभ

सिडनी : भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने बुधवारी सरावाला प्रारंभ केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान लाभलेल्या साहाला स्नायूंच्या दुखापतीमुळे ‘आयपीएल’च्या बाद फेरीच्या लढतींना मुकावे लागले; परंतु साहा आता या दुखापतीतून सावरला असून ‘बीसीसीआय’ने त्याची सराव करतानाची चित्रफीत ट्विटरवर पोस्ट केली.

रिचर्डसनची माघार, टायचा समावेश

सिडनी : वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने वैयक्तिक कारणास्तव भारताविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिचर्डसनच्या जागी अँड्रय़ू टायचा ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:17 am

Web Title: bumra shami possibility of skipping twenty20 matches in preparation for test series abn 97
Next Stories
1 हंगेरी बुद्धिबळ स्पर्धा : मेंडोसाला जेतेपद
2 एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा : झ्वेरेव्हचे आव्हान कायम
3 जर्मनीचा धुव्वा उडवत स्पेन उपांत्य फेरीत
Just Now!
X