07 July 2020

News Flash

विजयी घोडदौड राखण्यासाठी बायर्न म्युनिक उत्सुक

करोनानंतर बुंडेसलिगा सुरू झाल्यावर बायर्नने तीनही लढती जिंकून त्यांची हंगामातील दणदणीत कामगिरी कायम ठेवली आहे

रॉबर्ट लेवांडोवस्की

बुंडेसलिगा फुटबॉलमध्ये बायर्न म्युनिक शनिवारी डय़ुसेलडॉर्फशी खेळणार आहे. सलग आठव्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या बायर्नची रॉबर्ट लेवांडोवस्कीवर प्रामुख्याने मदार आहे. मंगळवारी दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या बोरुसिया डॉर्टमंडला १-० नमवत बायर्नने सात गुणांची आघाडी मिळवली आहे. करोनानंतर बुंडेसलिगा सुरू झाल्यावर बायर्नने तीनही लढती जिंकून त्यांची हंगामातील दणदणीत कामगिरी कायम ठेवली आहे. अन्य लढत वर्डर ब्रेमेन आणि शाल्के यांच्यात होणार आहे. १८ संघांमध्ये १७व्या स्थानी घसरल्याने ब्रेमेन यंदाच्या हंगामातून स्पर्धेबाहेर पडण्याची शक्यता आहे. आजच्या लढती : शाल्के विरुद्ध वर्डर ब्रेमेन (सायंकाळी. ७ वा.)

बायर्न म्युनिक विरुद्ध डय़ुसेलडॉर्फ (रात्री १० वा.)

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि २

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 2:00 am

Web Title: bundesliga football bayern munich will play against dusseldorf on saturday abn 97
Next Stories
1 भारत आणखी २५-३० वर्षे बुद्धिबळातील महासत्ता!
2 Forbes : सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट एकटा क्रिकेटपटू
3 मोहम्मद शमी विचारतोय, Indoor Cricket चे नियम काय असतात??
Just Now!
X