इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला असून यामध्ये फिरकीपटू अ‍ॅस्टन अगर आणि युवा फलंदाज जो बर्न्‍स यांना संधी देण्यात आली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधून कर्णधार मायकेल क्लार्क आणि यष्टिरक्षक ब्रॅड हॅडिन यांनी निवृत्ती घेतली आहे. त्याचबरोबर अ‍ॅशेस मालिकेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्यामुळे वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन आणि जोश हॅझेलवूड यांना विश्रांती देण्यात आली आहे. इंग्लंडचा संघ आर्यलडविरुद्ध एक एकदिवसीय सामना खेळणार असून त्यानंतर इंग्लंडविरुद्ध एक ट्वेन्टी-२० सामना खेळणार आहे. त्यानंतर ३ सप्टेंबरपासून इंग्लंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), जॉर्ज बेली, अ‍ॅस्टन अगर, जो बर्न्‍स, नॅथल-कल्टर-निले, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू व्ॉड (यष्टिरक्षक), शेन वॉटॉसन, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरुन बॉइस (फक्त ट्वेन्टी-२०साठी).