News Flash

लिव्हरपूलचा दणदणीत विजय

डॅनिएल स्टरिजचे दोन गोल; बर्टन अ‍ॅलबियनवर मात

लिव्हरपूलचा दणदणीत विजय

डॅनिएल स्टरिजचे दोन गोल; बर्टन अ‍ॅलबियनवर मात

लिव्हरपूलने डॅनिएल स्टरिजच्या दोन गोलच्या जोरावर बर्टन अ‍ॅलबियनचा ५-० असा धुव्वा उडवीत लीग चषक फुटबॉल स्पध्रेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. माजी विजेत्या चेल्सीला ब्रिस्टोल रोव्हर्सविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा लागला. चेल्सीने ३-२ असा निसटता विजय मिळवत आगेकूच केली.

डिव्होक ओरिजीने (१५ मि.) व रॉबेटरे फिरमिनो (२२ मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून लिव्हरपूलला मध्यंतरापर्यंत २-० अशा आघाडीवर ठेवले. दुसऱ्या सत्रात टी. लेयलरच्या स्वयंगोलने लिव्हरपूलच्या आघाडीत ३-० अशी भर टाकली. अखेरच्या १२ मिनिटांत स्टरीड्जने (७८ व ८३ मि.) दोन गोल करून लिव्हरपूलला ५-० असा दणदणीत विजय मिळवून दिला.

दुसऱ्या लढतीत चेल्सीकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या मिची बॅत्शुआयीने दोन गोल केले, तर विक्टर मोजेसने एक गोल करून विजयात हातभार लावला. चेल्सीचे प्रशिक्षक अ‍ॅटोनियो कोंटे यांचा हा सलग तिसरा विजय आहे. रोव्हर्सकडून पीटर हार्टली व एलिस हॅरिसन यांनी प्रत्येकी एक गोल करून सामन्याची चुरस वाढवली होती.

इंग्लिश प्रीमिअर लीगमधील क्रिस्टल पॅलेस, एव्हर्टन, हल सिटी, स्वानसी सिटी आणि स्टोक सिटी यांनीही सहज विजय मिळवले. पीटर क्राऊचच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर स्टोक सिटीने ४-० अशा फरकाने स्टीव्हनेजचा पराभव केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2016 3:05 am

Web Title: burton albion 0 5 liverpool
Next Stories
1 ‘दरबान व त्रिनिदादमधील मैदाने निकृष्ट दर्जाची’
2 Bcci: पहिल्याच दौऱ्यात यशस्वी कामगिरी करणाऱ्या कुंबळेला शास्त्रीपेक्षा कमी वेतन
3 संघात निवडीसाठी बीसीसीआय सदस्यांची ‘सेक्सुअल फेवर्स’ची मागणी
Just Now!
X