BWF World Tour Finals : गुआंगझू येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूने स्पर्धेच्या अंतिम फेरीत नोझुमी ओकुहारा हिला पराभूत करत या स्पर्धेचे पहिलेवहिले विजेतेपद पटकावले. तिने ओकुहारा हिला २१-१९, २१-१७ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले आणि ऐतिहासिक विजय मिळवला. सिंधूचा हा कारकिर्दीतील ३०० वा विजय ठरला. सलग सात वेळा पराभव स्वीकरल्यानांतर अखेर सिंधूने आज विजेतेपद पटकावले. या वर्षात सिंधूने एकही विजेतेपद जिंकले नव्हते. त्यामुळे हे विजेतेपद पटकावून तिने हंगामाचा शेवट गोड केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काल सिंधूने उपांत्य फेरीत रॅट्चनॉक इंटानॉन हिला २१-१६, २५-२३ असे पराभूत केले होते. पहिला गेम सिंधूने सहज जिंकला होता. पण दुसऱ्या गेममध्ये इंटानॉन हिने कडवी झुंज दिली. अखेर २५-२३ अशा गुणसंख्येने सिंधूने विजयावर शिक्कामोर्तब केले होते. त्याआधी तिने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या झँग बीवन हिला २१-९, २१-१५ अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. पहिल्या गेममध्ये सिंधूने बीवन हिला २१-९ अशा मोठ्या फरकाने पराभूत केले आणि सामन्यात आघाडी घेतली. त्यानंतर बीवनने सिंधूला दुसऱ्या गेममध्ये चांगली टक्कर दिली. पण अखेर सिंधूच्या अनुभवापुढे तिचे प्रयत्न फोल ठरले. दुसरा गेम २१-१५ असा जिंकत तिने उपांत्य फेरीत धडक मारली. तर सलग सहा सामन्यांमध्ये झालेल्या पराभवाची परतफेड करीत त्याआधीच्या फेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधूने ताय झु यिंगवर मात केली होती. पहिल्या गेममधील पिछाडीनंतरदेखील चायनीज तैपेईच्या ताय झु यिंगला हरवणे अशक्य असल्याच्या वदंतेला सिंधूने उद्ध्वस्त केले. सिंधूने हा सामना १४-२१, २१-१६, २१-१८ असा जिंकला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bwf world tour finals pv sindhu won over okuhara to become first indian to win the season ending championship
First published on: 16-12-2018 at 12:02 IST