01 March 2021

News Flash

IND vs AUS: ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचं BCCIला खुलं पत्र, वाचा नक्की काय आहे प्रकरण

दौरा संपताच दुसऱ्या दिवशी ट्विटरवर पोस्ट केलं दोन पानी पत्र

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात ३ गडी राखून विजय मिळवला. ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने मालिका जिंकत भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकून स्वत:कडेच ठेवण्यात यश मिळवलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या होत्या. तर भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर हे आव्हाना पार पाडले. या विजयानंतर भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने BCCIला एक खुलं पत्र लिहिलं.

IPL 2021: लिलावाआधी CSK ‘या’ दोन खेळाडूंना देणार सोडचिठ्ठी?

करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट मालिका खेळणार की नाही यावरून खूप चर्चा होती. पण IPLच्या यशस्वी आयोजनानंतर भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी क्वारंटाइनच्या नियमांचे पालन केले आणि त्यानंतर नियोजित असलेली क्रिकेट मालिका खेळली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियातील वन डे, टी२० आणि कसोटी अशा तिनही क्रिकेट मालिका यशस्वीपणे पार पाडल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींनाही काही काळ मनोरंजनाचा आस्वाद घेता आला, अशा आशयाचं धन्यवादपर पत्र क्रिकेट ऑस्ट्रलियाने BCCIला लिहिलं.

“भारतीय क्रिकेटपटूंना कधीही कमी समजू नका, कारण…”; ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाची कबुली

विविध आव्हानांचा सामना करूनही भारतीय संघाने यशस्वीपणे बॉर्डर गावसकर कसोटी मालिका जिंकली आणि ट्रॉफी स्वत:कडेच राखण्यात यश मिळवलं. बुमराहपासून कमिन्सपर्यंत, रहाणेपासून स्टीव्ह स्मिथपर्यंत आणि शुबमन गिलपासून ते कॅमेरॉन ग्रीनपर्यंत विविध आघाड्यांवर तोडीस तोड असा खेळ पाहायला मिळाला. आमचा अगदी जवळचा मित्र असलेल्या BCCIने हा क्रिकेट दौरा यशस्वी केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. त्यांनी आम्हाला जी मदत केली ती मदत आम्ही कधीही विसरणार नाही. तसच हा क्रिकेट दौरा यशस्वी करण्यामागे इतर ज्यांचे ज्यांचे हातभार लागले त्या साऱ्यांना धन्यवाद, असाही संदेश पत्रातून देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 2:58 pm

Web Title: ca letter cricket australia pens open letter to bcci congratulating team india for their resilience courage skill vjb 91
Next Stories
1 एक नंबर ऋषभ! ICC क्रमवारीत पंतची फिनिक्स भरारी
2 ऑस्ट्रेलियाचा ३२ वर्षांचा अबाधित विक्रम मोडल्याने मायकल क्लार्क संतापला; म्हणाला…
3 IPL 2021: लिलावाआधी CSK ‘या’ दोन खेळाडूंना देणार सोडचिठ्ठी?
Just Now!
X