भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा अध्यक्ष सौरव गांगुली याचे मत

आम्ही गुलाबी चेंडूचा उपयोग करून दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी प्रयत्नशील आहोत, पण त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) आम्हाला परवानगी हवी आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचा

(कॅब) अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केले.

‘भविष्यामध्ये आम्ही गुलाबी चेंडूूनीशी दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामने खेळवण्याची इच्छा आहे. आम्ही दिवस-रात्र कसोटी खेळवण्यासाठी सज्ज आहोत. आम्ही दिवस-रात्र चार दिवसीय स्थानिक सामना खेळवण्याच्या तयारीत आहोत. पण त्यासाठी आम्हाला बीसीसीआयच्या परवानगीची आवश्यकता आहे,’ असे गांगुली म्हणाला.

या वर्षांच्या अखेरीस न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये न्यूझीलंडचा संघ एक दिवस-रात्र कसोटी खेळणार आहे. पण त्यापूर्वी काही स्थानिक सामन्यांमध्ये हा प्रयोग करायला हवा, असे बीसीसीआयचे मत आहे.

या धर्तीवर कॅबने एक पाऊल पुढे टाकले आहे. पुढील महिन्यात सुपर लीगचा अंतिम सामना होणार असून हा सामना दिवस-रात्र खेळवण्याचा प्रयोग बीसीसीआय करणार आहे.

दुखापतींमुळे पुण्याची वाताहत

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाची वाताहत होताना आपण पाहत आहोत, यासाठी दुखापती हे मुख्य कारण आहे. कारण पुण्याचा संघ चांगलाच समतोल आहे, पण दुखापतींमुळे त्यांना चांगले खेळाडू गमवावे लागले आणि त्याचाच परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला आहे, असे गांगुली