News Flash

या भारतीय खेळाडुला ओळखलंत का ?

या महत्त्वपूर्ण लढतीपूर्वी आणखी एका गोष्टीने भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Team India : ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या छायाचित्रात रोहित शर्मा आणि भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग एकत्र दिसत आहेत.

भारतीय संघ आज ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडशी दोन हात करण्यास सज्ज झाला आहे. तमाम क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची प्रचंड उत्सुकता लागली आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण लढतीपूर्वी आणखी एका गोष्टीने भारतीय चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या छायाचित्रात रोहित शर्मा आणि भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग एकत्र दिसत आहेत. मात्र, यामध्ये वेगळ्या हेअरस्टाईलमुळे हरभजन सिंगला पटकन ओळखता येत नाही. हरभजनने केस कापल्याचे दिसत असून त्याच्या डोक्यावर नेहमीची पगडीदेखील छायाचित्रात दिसत नाही. त्याचा हा लूक सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2016 10:42 am

Web Title: can you recognise the india cricketer next to rohit sharma
Next Stories
1 इतिहास बदलण्याचे आव्हान
2 विजयाची मालिका कायम ठेवू -कोहली
3 ‘जामठात भारताला जिंकू देणार नाही’
Just Now!
X