विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हानवीर ठरवणाऱ्या कॅँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत सलामीला मंगळवारी हॉलंडचा अनिश गिरी आणि चीनचा डिंग लिरेन यांना पराभव पत्करावे लागले.

विजेतेपदाचा दावेदार अमेरिकेच्या फॅबियानो कॅरुआनाने त्याचा फ्रान्सच्या मॅक्सिम वॅशियर-लॅग्रेवविरुद्धचा पहिल्या फेरीतील डाव ४४ चालींमध्ये बरोबरीत सोडवला. अलेक्झांडर ग्रिशुक आणि किरिल अलेक्सिन्को या दोन रशियाच्या खेळाडूंमधील डावही ४१ चालींमध्ये बरोबरीत संपला.

अनिश गिरीला मात्र पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळूनही रशियाच्या इयन नेपोमनियाश्चीकडून ७३ चालींत पराभवाचा धक्का बसला. सुरुवातीला केलेल्या काही चुकांनंतर वेळ कमी पडत असूनही गिरीने झुंज दिली. मात्र त्याला अखेर पराभव मान्य करावा लागला. लिरेनचाही त्याच्याच देशाच्या वॅँग हाओकडून ४५ चालींत पराभव झाला. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याचा फायदा लिरेनला घेता आला नाही.