देशासाठी पदक जिंकणाऱ्या किंवा जिंकू शकणाऱ्या सक्षम खेळाडूंना शासनाने आर्थिक स्वरूपाची मदत दिली असून अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालला या गोष्टीचा चांगला फायदा झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या सक्षम खेळाडूंना शासकीय योजना मिळायला हवी, असे मत सायनाने व्यक्त केले आहे.
मार्चमध्ये झालेल्या प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड खुल्या अजिंक्यपद स्पध्रेत अंतिम फेरी गाठणाऱ्य सायनाला सरकारकडून २५ लाख रुपयांचा धनादेश दिला. ‘‘जे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्यासाठी सक्षम आहेत, त्यांना  योजनेचा लाभ मिळायला हवा. या योजनेमुळे आम्हाला चांगलाचा पाठिंबा मिळाला आहे. माझे काम  फक्त खेळावर लक्ष केंद्रित करण्यापुरतेच राहिले आहे,’’ असे सायना म्हणाली.