फॅबिओ कॅपेलो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या रशियाची विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा करण्यात आली. २३ सदस्यीय संघाचे नेतृत्व अनुभवी बचावपटू सर्जेई इग्नाशेहव्हिचकडे असणार आहे. ३१ वर्षीय अलेक्झांडर कझ्रेखाव्ह हा विश्वचषकवारीचा अनुभव असणारा एकमेव खेळाडू आहे. कॅपेलो यांनी सुरुवातीला संघातील खेळाडूंची संख्या ३० निश्चित केली होती, मात्र मात्र तूर्तास त्यांनी २३ खेळाडूंची घोषणा केली आहे. आंद्रेई सेमेनोव्ह आणि मॅक्सिम कॉनिकोव्ह या युवा खेळाडूंना कॅपेलो यांनी संघात समाविष्ट केले आहे. नॉर्वेविरुद्धची मैत्रीपूर्ण लढत १-१ बरोबरीत सोडवल्यानंतर कॅपेलो यांनी संघ जाहीर केला. गेल्या महिन्यात स्लोव्हाकियाविरुद्धच्या लढतीत रशियाने १-० असा विजय मिळवला होता. रशियन प्रीमिअर लीग स्पर्धेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या खेळाडूंना कॅपेलोंच्या संघात स्थान मिळाले आहे. विश्वचषकात रशियाचा सलामीचा मुकाबला दक्षिण कोरियाशी १८ जूनला होणार आहे.
संघ : गोलरक्षक : इगोर अकिनफिव्ह, युरी लॉडगिन, सर्जेई रायझिकोव्ह. बचावपटू : व्ॉसिली बझ्रेत्झुकी, सर्जेई इग्नाशेहव्हिच, जॉर्जी श्हचेनिकोव्ह, व्लादिमीर ग्रानत, अलेक्सी कोझलाव्ह, आंद्रेई येश्नेको, दिम्त्री कोमबारोव्ह, आंद्रेई सेमेनोव्ह. मधल्या फळीतील खेळाडू : इगोर डेनिसोव्ह, युरी झिरकोव्ह, अलान झागोव्ह, रोमन शिरोकोव्ह, डेनिस ग्लुशकोव्ह, व्हिक्टर फैझुलिन, ओलेग शाटोव्ह. आघाडीपटू : अलेक्झांडर कर्झाकोव्ह, अलेक्सी इव्हनोव्ह, अलेक्झांडर कोकरिन, मॅक्सिम कॉनिकोव्ह, अलेक्झांडर सामेदोव्ह.