चौसष्ट चौकटींच्या राज्यावर मॅग्नस कार्लसनने पुन्हा एकदा आपली हुकूमत सिद्ध केली, तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. चेन्नईपाठोपाठ सोचीमध्ये सलग दुसऱ्यांदा नॉर्वेच्या कार्लसनने आपल्या  k10k09वर्चस्वाचा झेंडा डौलाने फडकावला. विश्व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पध्रेच्या ११व्या डावात विश्वनाथन आनंदने पराभव पत्करला. त्यामुळे १२ डावांच्या जगज्जेतेपदाच्या लढतीत शेवटून दुसऱ्या डावातच कार्लसनने ६.५-४.५ अशा फरकाने आपली मोहोर उमटवली.
आनंदने बुद्धिबळाचे विश्वविजेतेपद पुन्हा प्राप्त करण्यासाठी कार्लसनला यंदा पूर्ण ताकदीने लढत दिली, असे जाणकारांचे म्हणणे आहे. २०१३मध्ये १०व्या डावातच कार्लसनने आनंदचे जगज्जेतेपद खालसा केले होते. या वर्षी आनंदने एक डाव अधिक लढत दिली.
पाच वेळा विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या आनंदने या डावात बरोबरी मान्य केली असती, तर १२व्या डावापर्यंत ही लढत लांबली असतील. परंतु आनंदला हे मान्य नव्हते. आनंदला मिळालेल्या पहिल्या संधीच्या वेळीसुद्धा त्याने कठीण परिस्थिती निर्माण केली.
११व्या डावात कार्लसनपेक्षा कमी चुका केल्या. आनंदला या सामन्याची चांगली संधी होती, असे जाणकार सांगतात. आनंदने प्याद्यासाठी हत्तीचा बळी देण्याचा निर्णय आश्चर्यकारक होता. कार्लसनने मात्र योजनाबद्ध खेळाचे प्रदर्शन करीत ४५व्या चालीत विजय संपादन केला.

माझ्या कामगिरीत सातत्य नव्हते, परंतु तरीही मी जिंकू शकलो. मी अजूनही खूप सुधारणा करू शकतो!
-मॅग्नस कार्लसन

मी चुकीचा डाव खेळलो आणि त्याची मला शिक्षा मिळाली!
-विश्वनाथन आनंद