News Flash

कार्लसनने विजयाची संधी गमावली

२७ वर्षीय कार्लसनने एका दिवसाच्या विश्रांतीनंतर नवव्या लढतीसाठी अधिक तयारी केली होती

कार्लसनने विजयाची संधी गमावली
(संग्रहित छायाचित्र)

जागतिक  बुद्धिबळ स्पर्धा

नववा डावही बरोबरीत

चांगली सुरुवात करूनही कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे तीन वेळा जगज्जेता ठरलेल्या मॅग्नस कार्लसनला नवव्या डावातही बरोबरीवर समाधान मानावे लागले. कार्लसनला संयम न राखता आल्यामुळे अमेरिकेचा आव्हानवीर फॅबियानो करुआना याला डाव बरोबरीत सोडवण्याची संधी मिळाली. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेतील नऊ डाव बरोबरीत सुटल्यामुळे दोघांचे प्रत्येकी ४.५ गुण झाले आहेत. आता उर्वरित तीन क्लासिकल डावांमध्ये विजय मिळवण्याचा दोघांचा प्रयत्न असेल.

२७ वर्षीय कार्लसनने एका दिवसाच्या विश्रांतीनंतर नवव्या लढतीसाठी अधिक तयारी केली होती. सुरुवातीलाच दमदार चाली रचत त्याने पटावर चांगली स्थिती निर्माण केली होती. पण एका चुकीमुळे करुआनाला पुनरागमन करण्याची संधी मिळाली. अखेर ५८ चालीनंतर हा डाव बरोबरीत सुटला. ‘‘विजय मिळवण्याची चांगली संधी मी दडवली. यासाठी मीच कारणीभूत आहे,’’ असे निराश झालेल्या कार्लसनने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 3:32 am

Web Title: carlson lost his chance of winning
Next Stories
1 कबड्डीला गरज सांख्यिकीची!
2 समीर, सायना, कश्यप उपांत्यपूर्व फेरीत
3 राज्य कबड्डी निवडणूक : निवडणूक स्थगित करण्याची मागणी
Just Now!
X