20 September 2020

News Flash

सिंधू-सायनासोबत सेल्फी घेण्यासाठी ऑलिम्पिक विजेत्या मरीनची आई रांगेत

सिंधू-सायनाच्या आई-वडिलांसोबतही फोटो सेशन

सिंधू- सायना नेहवाल यांच्याभोवती चाहत्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूला जपानच्या नोझोमी आकुहाराने पराभूत केले. निसटत्या पराभवानंतरही सिंधूची क्रेझ कमी झालेली नाही. अंतिम सामन्यानंतर ग्लासगोच्या मैदानाबाहेर भारतीय चाहते सायना नेहवाल आणि सिंधूची आतुरतेने वाट पाहताना दिसले. या चाहत्यांमध्ये कॅरोलिना मरीनची आई देखील भारतीय बॅडमिंटनपटूंच्या खेळानं प्रभावित झाल्याचे पाहायला मिळाले. हो! तिच मरीन जिच्याकडून सिंधूला ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.

अंतिम सामन्यानंतर कोर्टच्या बाहेर टोनी मरीन या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधूसोबत सेल्फी घेताना दिसल्या. भारतीय चाहते ज्या रांगेत आपल्या स्टारची वाट पाहत उभे होते. त्याच रांगेत टोनी मरीन सिंधू आणि सायनाची वाट पाहत उभ्या होत्या. भारतीय बॅडमिंटन स्टारसोबत सेल्फी घेतल्यानंतर टोनी यांनी सिंधूची आई विजयालक्ष्मी आणि सानियाचे वडील हरवीर नेहवाल यांच्यासोबतही फोटो सेशन केलं.

ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारी स्पेनची कॅरोलिनाने २०१५ ची विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. पण यंदाच्या स्पर्धेत तिला अपयशाचा सामना करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या नोझोमी आकुहाराने कॅरोलिनाला १८-२१, २१-१४, १५-२१ असे पराभूत केले होते. त्यानंतर अंतिम सामन्यात नोझोमीने सिंधूला धक्का देत सुवर्ण पदकाची कमाई केली. त्यामुळे सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे भारताची फुलराणी सायना नेहवालने या स्पर्धेत कास्य पदक पटकवले होते. रिओ ऑलिम्पिकनंतर इंडिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेत सिंधूने मरीनला सरळ गेम्समध्ये नमवण्याची किमया साधली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 5:50 pm

Web Title: carolina marins mother waits with indian fans for selfie with pv sindhu saina nehwal
Next Stories
1 मालिका विजयाचा आनंद, विराट कोहलीचा शमीच्या मुलीसोबत डान्स
2 कोहलीचे नेतृत्त्व सचिनपेक्षा भारी!, धोनी अव्वलस्थानी
3 Major Dhyanchand Birth Anniversary Special : …तोपर्यंत हॉकीला पुन्हा अच्छे दिन येणार नाहीत!
Just Now!
X