सेसील राईट हे नाव फारसं परिचयाचं नाही, पण वेस्ट इंडिजमध्ये आणि क्रिकेट विश्वात सध्या याच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. वेस्ट इंडिजच्या क्रिकेट इतिहासात गॅरी सोबर्स, वेस हॉल, गारफिल्ड सोबर्स आणि सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्यासारखे दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले. आपल्या समृद्ध अशा कारकिर्दीत त्यांनी दमदार कामगिरी केली आणि निवृत्ती स्वीकारली. पण अंदाजे त्यांच्याच काळात क्रिकेटपटू म्हणून उदयास आलेले सेसील राईट मात्र अजूनही क्रिकेटच्या मैदानात सक्रीय आहेत. महत्वाचे म्हणजे आता अखेर वयाच्या ८५ व्या वर्षी सेसील राईट हे निवृत्ती स्वीकारणार आहेत.

सेसील राईट यांनी बार्बाडोस संघाचे प्रतिनिधित्व केले असून वेस हॉलला वेगवान गोलंदाजी केली आहे. त्यानंतर १९५९ ते इंग्लंडमध्ये गेले आणि त्यांनी सेंट्रल लँकशायर लीग स्पर्धेत क्रॉम्प्टन संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांना १९६२ साली इंग्लंडमध्ये आयुष्याची जोडीदार एनीड सापडली. एनीड यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर सेसील यांनी इंग्लंडमध्ये कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
sachin tendulkar finance marathi news
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू की कलाकार?
hamari Athapaththu 195 Runs Inning Helps Sri Lanka Chase Highest Record in Women ODI
SAW vs SLW: कितनी बडी बात? महिलांनीही पाडला एका दिवसात ६०० धावांचा पाऊस; दोघींनीच केल्या ३७९
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेत रचला इतिहास, आयपीएलच्या १७ वर्षांत ही कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज

सेसील राईट यांनी एकूण ६० वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत सुमारे २ लाखांहून अधिक सामने खेळले असून सात हजारांहून अधिक बळी टिपले आहेत. उमेदीच्या काळात तर त्यांनी ५ हंगामात मिळून ५३८ बळी टिपले होते. इतक्या समृद्ध कारकिर्दीनंतर अखेर सेसील यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

“मी इतके वर्षे कसा खेळू शकलो हे मला माहिती नाही. त्यामागे काय रहस्य आहे हे मलादेखील माहिती नाही. त्यामुळे ते मी तुम्हालाही सांगू शकत नाही”, असे सेसील म्हणाले.

सेसील राईट हे ७ सप्टेंबरला आपला शेवटचा क्रिकेट सामना खेळणार आहेत. ओल्डहॅम येथे पेनी लीग स्पर्धेत सेसील स्प्रिंगहेड संघाविरूद्ध अप्परमिल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत आणि त्या सामन्यानंतर ८५ व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहेत.