News Flash

सेलिब्रिटी कट्टा : सचिनविना रंग सुना..

मला क्रिकेटचे फारसे वेड नाही, परंतु मुंबईमध्ये राहून आपण क्रिकेटचे चाहते झालो नाही असे होणार नाही.

भार्गवी चिरमुले

भार्गवी चिरमुले

मला क्रिकेटचे फारसे वेड नाही, परंतु मुंबईमध्ये राहून आपण क्रिकेटचे चाहते झालो नाही असे होणार नाही. पु. ल. देशपांडे विनोदाने म्हणतात तसे, जगासाठी जरी हा मैदानी खेळ असला तरी मुंबईच्या चाळींमधल्या गॅलरीत कसोटी सामने रंगतात. आपण शिवाजी पार्कात सहज जाऊन बसलो तरी आपल्याला क्रिकेटचे वेड लागते. माझ्यासाठी क्रिकेट म्हणजे सचिन तेंडुलकर आहे. ते दैवत आहे. सचिनच्या निवृत्तीनंतर क्रिकेट पाहण्यात मला फार रस उरला नाही. पण भारतीय संघाचा कायमच अभिमान वाटत आला आहे. सौरव गांगुली, युवराज सिंग, महेंद्रसिंह धोनी असे आदर्शवत खेळाडू आपल्या संघाला लाभले आहेत. माझ्या भाचीला क्रिकेटचे प्रचंड वेड आहे. तिच्याजवळ जाताना मला क्रिकेटचा अभ्यास करून जावे लागते किंवा हल्ली तिच्यामुळेच मला क्रिकेटविश्वातल्या अनेक घडामोडी कळतात. गेल्या विश्वचषकादरम्यान मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अंतिम टप्प्यात आला होता. अखेरच्या काही षटकांचा खेळ बाकी असताना मी सेटवर पोहोचले तर सेटवर कुणीच दिसेना. नंतर लक्षात आले की, सामना पाहता यावा यासाठी सर्व टीम चित्रीकरण थांबवून क्रिकेट पाहण्यात मग्न होती.

(शब्दांकन : नीलेश अडसूळ)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 1:00 am

Web Title: celebrity article on cricket world cup
Next Stories
1 आफ्रिकेसाठी अस्तित्वाची लढाई!
2 अन् धोनीने बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्हज् टाळले!
3 Video : धोनीचा ‘तो’ षटकार पाहून विराटही झाला अवाक
Just Now!
X