18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

विराट ब्रिगेड घेणार अभिषेक बच्चनच्या टीमशी पंगा!

मुंबईच्या मैदानात रंगणार फुटबॉलचा सामना

ऑनलाइन टीम | Updated: October 12, 2017 4:00 PM

विराट कोहली आणि अभिषेक बच्चन

भारतीय क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार यांच्यात फुटबॉलचा सामना रंगणार आहे. मुंबईतील अंधेरी कॉम्प्लेक्समध्ये विराटच्या नेतृत्वाखालील ऑल हर्ट फुटबॉल क्लब आणि अभिषेक बच्चन याच्या नेतृत्वाखालील ऑल स्टार्स फुटबॉल क्लब यांच्यात १५ ऑक्टोबरला सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघातील २५ सदस्यांच्या नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात रणबीर कपूर, महेंद्रसिंह धोनी यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकार आणि क्रिकेटर्स मैदानात उतरणार आहेत.

कोर्नस्टोन स्पोर्ट आणि जीएस एण्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. विराट कोहलीच्या संघात त्याच्या संघातील सहकाऱ्यांशिवाय भारतीय राष्ट्रीय हॉकी संघातील गोलकिपर पीआर श्रीजेश, टेनिसपटू रोहन बोपन्ना यांचा समावेश आहे. तर अभिषेक बच्चनच्या संघात रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य रॉय कपूर आणि यांचा समावेश आहे.

ऑल हर्ट फुटबॉल क्लब
विराट कोहली (कर्णधार), एमएस धोनी, शिखर धवन, केएल राहुल, अजिंक्य रहाणे, भुवनेश्वर कुमार, केदार जाधव, एस बद्रीनाथ, हार्दिक पांड्या, पवन नेगी, दिग्विजय, रोहित शर्मा, जहीर खान, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, जॉन्टी ऱ्होड्स, उमेश यादव, पीआर श्रीजेश, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रोहन बोपन्ना, अनुप श्रीधर, युजवेंद्र चहल, बी मंगलदास, अनिरुद्ध श्रीकांत.

ऑल स्टार्स फुटबॉल क्लब
अभिषेक बच्चन (कर्णधार), रणबीर कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, आदित्य कपूर, अर्जुन कपूर, डिनो मोरिया, सुरजित सरकार, कार्तिक आर्यन, अरमान जिन, शब्बीर अहलुवालिया, सचिन जोशी, निशांत मेहरा, अपारशक्ती खुराना, जिम सर्भ, विवियन दसेना, कारन वीर मेहरा, राज कुंद्रा, आदर जैन, विक्रम थापा, रोहन श्रेष्ठा, मार्क रॉबिन्सन, हरप्रित बावेजा, शशांक खेतान.

मागील वर्षी देखील क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकारांमध्ये असा सामना खेळवण्यात आला होता. यावेळी दोन्ही संघांनी २-२ गोल नोंदवत सामना बरोबरीत राखला होता.

First Published on October 12, 2017 3:59 pm

Web Title: celebrity clasico 2017 virat kohli abhishek bachchan football match team complete list of players