News Flash

राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रातील क्रीडा साहित्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी

औरंगाबाद येथे अत्याधुनिक जलतरण तलाव, टर्फ हॉकी मैदानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले

औरंगाबाद : राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणातील औरंगाबाद येथील उत्कृष्ट केंद्रामध्ये अत्याधुनिक साहित्य खरेदीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांनी केली. औरंगाबाद येथे अत्याधुनिक जलतरण तलाव, टर्फ हॉकी मैदानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. येत्या काळात क्रीडा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याच्या मागणीचाही सकारात्मक विचार करू असे ते म्हणाले. खासदार डॉ. भागवत कराड, इम्तियाज जलील , आमदार अंबादास दानवे, अतुल सावे हे या वेळी उपस्थित होते.

भारतीय परंपरेत अनेक प्रकारचे क्रीडा प्रकार आहेत. पण खेळांना जगण्याचे स्थान देण्याइतपत आपण त्याचे महत्त्व वाढवू शकलो नाही. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्यासाठी लागणारी जिद्द कमी पडल्याचे दिसून येत असल्याने खेलो इंडियाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले. प्रत्येक राज्यात कें्रदीय उत्कृष्टता केंद्र उघडण्याचे धोरण आहे. सर्वत्र सर्व क्रीडा प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी काही राज्यांनी त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करावे असे धोरण आखण्यात आले. यामध्ये सर्वाधिक सात क्रीडा प्रकारांना औरंगाबादच्या केंद्रासाठी मान्यता देण्यात आली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 1:12 am

Web Title: centre to allot rs 5 crore to ncoe aurangabad says kiren rijiju zws 70
Next Stories
1 …त्यानंतर विराटची माफी मागितली, रहाणेचा खुलासा
2 बॉक्सिंग डे कसोटीपूर्वीच कांगारुंनी घेतला ऋषभ पंतचा धसका
3 Viral Video : एका हातानं मारलेला ‘हेलिकॉप्टर शॉट’ पाहिलात का?
Just Now!
X