06 July 2020

News Flash

डाव मांडियेला : शतकी ठेका

शतकी ठेका बोलीच्या दस्तगुणांवरून ठरतो. किलवर व चौकट हे कनिष्ठ पंथ, त्यांच्या एका दस्ताची किंमत वीस

संग्रहित छायाचित्र

डॉ. प्रकाश परांजपे

जोडीच्या स्टेटसवर बक्षिसगुण ठरतात. जोडी फ्रेश असेल तर ५०-३००-५००-१००० असे; व्हल  असेल तर ५०-५००-७५०-१५०० असे बक्षिसगुण ठेक्याच्या आवाक्यावर अवलंबून असतात. सामान्य ठेका, शतकी ठेका, छोटा कोट आणि मोठा कोट अशा या चार पायऱ्या आहेत. मोठा कोट म्हणजे सगळेच्या सगळे १३ दस्त बोली लावून जिंकणे. ब्रिजच्या प्रथेप्रमाणे १ या पातळीवरची बोली म्हणजे १+६ = ७ दस्त करण्याचा वायदा, १३ दस्त म्हणजे १३-६=७ ची बोली. छोटा कोट म्हणजे ६ ची बोली.

शतकी ठेका बोलीच्या दस्तगुणांवरून ठरतो. किलवर व चौकट हे कनिष्ठ पंथ, त्यांच्या एका दस्ताची किंमत वीस. ५ किलवरचा ठेका असेल तर  ५ कि. बोलीचे २० गुणिले ५=१०० दस्तगुण, म्हणून तो शतकी ठेका, पाचच्या खाली किलवर सामान्य ठेका, म्हणजे फक्त ५० बक्षिसगुण. इस्पिक व बदाम हे ज्येष्ठ पंथ. त्यांच्या एका दस्ताची किंमत तीस. चार किंवा अधिक इस्पिकचा ठेका म्हणजे शतकी ठेका, त्याखाली सामान्य ठेका. बिनहुकमी हा सगळ्यात मानाचा पंथ. त्याच्या पहिल्या दस्ताची किंमत चाळीस आणि पुढच्या प्रत्येक दस्त्याची किंमत इस्पिक-बदाम प्रमाणे ३०. या खास मानामुळे तीन बिनहुकमीचा ठेका शतकी ठेका बनतो  (४०+३०+३०=१००).

खेळताना जितके दस्त होतील त्याप्रमाणे दस्तगुण मिळतात, पण बक्षिसगुण मात्र बोली जितकी असेल त्यावर अवलंबून मिळतात. उदाहरणार्थ ३ बिनहुकमीचा ठेका घेऊन फ्रेश असताना १० दस्त बनविले, तर १०-६=४ दस्तांचे गुण  म्हणजे १३० दस्तगुण मिळतील, तर ३०० बक्षिसगुण. म्हणजे एकूण गुण ४३०. छोटा किंवा मोठा कोट झाला तर त्याचे बक्षिसगुण मिळतातच, वर शतकी ठेक्याचे बक्षिसगुणही मिळतात.

’  २९ ते ३१ मार्च या दिवशी सकाळी ११:३० वाजता मी   https://www.twitch.tv/demicoma या संकेतस्थळावर धावतं वर्णन करणार आहे. रविवारी दुपारी तुम्हीही ब्रिजचा डाव जमवू शकाल! नंतरही खालील स्थळी  बघू शकता.

(आंतरराष्ट्रीय ब्रिज तज्ज्ञ, लेखक, समालोचक, खेळाडू, प्रशिक्षक)

panja@demicoma.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 2:54 am

Web Title: century contract brige game abn 97
Next Stories
1 भारतीय क्रिकेटपटूंसाठी ‘विश्रांती स्वागतार्ह’!
2 फुटबॉलपटू डोव्हाल औषधविक्रेत्याच्या भूमिकेत!
3 ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा होणारच!
Just Now!
X