पश्चिम बंगालचा अपराजित आंतरराष्ट्रीय मास्टर सप्तर्षी रॉयला चौथ्या मानांकित हैद्राबादचा आंतरराष्ट्रीय मास्टर चक्रवर्ती रेड्डीने ३३व्या चालीत पराभूत करत अखिल भारतीय खुल्या फिडे गुणांकित बुध्दीबळ स्पध्रेत सातव्या फेरी अखेर खळबळजनक विजयासह सर्वाधिक एकूण ६.५ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली. चक्रवर्ती रेड्डीने फ्रेंच बचाव पद्धतीचा अवलंब करीत सप्तर्षी रॉयला ३३व्या चालीत हार पत्करण्यास भाग पाडले. ६ गुणांसह तृतीय मानांकित गोव्याची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ती कुळकर्णी, मुंबईचा आंतरराष्ट्रीय मास्टर विक्रमादित्य कुळकर्णी, स्नेहल भोसले, सत्कार चिराग संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. ५.५ गुणांसह सप्तर्षी रॉयसह संजीव कुमार, राजाबाबू गजेंगी, ओमकार कडव, आकाश दळवी, केतन पाटील, विश्वा शाह तिसऱ्या स्थानी आहेत.