News Flash

बंगळूरुसमोर आव्हान गतविजेत्या चेन्नईचे

बेंगळूरु एफसीची मदार कर्णधार सुनील छेत्रीवर असून त्याला मिकूचीही मोलाची साथ लाभेल.

(संग्रहित छायाचित्र)

इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेच्या पाचव्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या चेन्नईयन एफसीसमोर गतउपविजेत्या बेंगळूरु एफसीचे आव्हान असेल. या सामन्यात विजय मिळवून चौथ्या पर्वाच्या अंतिम सामन्यात चेन्नईकडूनच झालेल्या ३-२ अशा पराभवाचा वचपा घेण्याची संधी बंगळूरुला आहे.

बेंगळूरु एफसीची मदार कर्णधार सुनील छेत्रीवर असून त्याला मिकूचीही मोलाची साथ लाभेल. शिवाय भारतीय संघाचा गोलरक्षक गुरप्रीतसिंग संधूही बेंगळूरुमध्येच असल्याने त्यांचा संघ समतोल वाटत आहे. चेन्नईच्या आक्रमणाची धुरा जेजे लालपेख्लुआ, आणि ब्रिकमजीत सिंगवर आहे. तसेच त्यांच्याकडे अनिरुद्ध थापासारखा युवा खेळाडूही आहे.

सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स ३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 12:55 am

Web Title: challenged by defending champions chennai to bangalore
Next Stories
1 भविष्यात संधी मिळाल्यास नेतृत्वासाठी सज्ज!
2 अजिंक्य रहाणेने सपत्नीक नरसोबावाडीला दिली भेट
3 IND vs WI : भारतीय संघांची घोषणा; शिखर धवन बाहेर, पृथ्वी शॉ-मयांक अग्रवालला संधी
Just Now!
X