26 September 2020

News Flash

मेसीच्या पुनरागमनानंतरही बार्सिलोनाला बरोबरीत समाधान

अखेरीस ५९व्या मिनिटाला अन्सू फॅटीच्या जागी मेसीला बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात आले.

डॉर्टमंड : संघाचा प्रमुख आक्रमणपटू लिओनेल मेसीच्या पुनरागमनानंतरही बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या पहिल्या सामन्यात विजयी सलामी देता आली नाही. मंगळवारी मध्यरात्री झालेल्या बोरुशिया डॉर्टमंडविरुद्धच्या लढतीत बार्सिलोनाला गोलशून्य बरोबरीवर समाधान मानावे लागले.

३२ वर्षीय मेसीला पोटरीच्या दुखापतीमुळे हंगामाच्या सुरुवातीच्या लढतींना मुकावे लागले होते. वेस्ट फॅलन स्टेडियमवर झालेल्या या लढतीतही मेसीला पहिल्या सत्रात मैदानाबाहेरच बसवण्यात आले होते. त्यातच ५७व्या मिनिटाला डॉर्टमंडला पेनल्टी बहाल करण्यात आली. परंतु त्यांचा कर्णधार मार्को रूसला या सुवर्णसंधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही.

अखेरीस ५९व्या मिनिटाला अन्सू फॅटीच्या जागी मेसीला बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात आले. परंतु मेसीला गोल करण्याची संधी क्वचितच मिळाली. त्याउलट डॉर्टमंडने सातत्याने बार्सिलोनावर आक्रमण केले. मात्र कोणालाही गोलजाळ्याचा वेळ घेणे जमले नाही.

उभय संघांमधील हा तिसरा सामना होता. यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांपैकी बार्सिलोनाने एक लढत जिंकली आहे, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.

१६ वयाच्या १६व्या वर्षी चॅम्पियन्स लीग खेळणारा अन्सू फॅटी हा बार्सिलोनाचा सर्वात युवा फुटबॉलपटू ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 3:34 am

Web Title: champions league dortmund draw with barcelona on messi return zws 70
Next Stories
1 भारत-द. आफ्रिका ‘अ’ क्रिकेट मालिका : भारत ‘अ’ संघाचे दुसऱ्या दिवसावरही वर्चस्व
2 जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : जागतिक स्पर्धेतून  हिमा दासची माघार
3 आशियाई टेबल टेनिस स्पर्धा : भारतीय पुरुष संघाला पाचवे स्थान
Just Now!
X