17 July 2019

News Flash

मँचेस्टर युनायटेडचे बार्सिलोनासमोर आव्हान

लिओनेल मेसीच्या बार्सिलोनापुढे रोमेलू लुकाकूच्या बलाढय़ मँचेस्टर युनायटेडचे आव्हान उभे ठाकले आहे.

क्लब फुटबॉलमधील प्रतिष्ठित स्पर्धा म्हणून नावलौकिक असलेल्या युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या यंदाच्या हंगामाचे उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले. त्यानुसार लिओनेल मेसीच्या बार्सिलोनापुढे रोमेलू लुकाकूच्या बलाढय़ मँचेस्टर युनायटेडचे आव्हान उभे ठाकले आहे.

९-१० एप्रिल रोजी उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील, तर १६-१७ एप्रिलला दुसऱ्या टप्प्याच्या लढती रंगणार आहेत. उपांत्यपूर्व फेरीत आयएक्स विरुद्ध युव्हेंटस, लिव्हरपूल विरुद्ध पोटरे, टॉटनहॅम हॉटस्पर विरुद्ध मँचेस्टर सिटी अशा अन्य तीन लढती रंगणार आहेत. याव्यतिरिक्त, उपांत्य सामन्यांचा पहिला टप्पा ३० एप्रिल-१ मे आणि दुसरा टप्पा ७-८ मे रोजी रंगणार आहे.

उपांत्यपूर्व फेरी

  • आयएक्स वि. युव्हेंटस
  • लिव्हरपूल वि. पोटरे
  • टॉटेनहॅम वि. मँचेस्टर सिटी
  • बार्सिलोना वि. मँचेस्टर युनायटेड

 

First Published on March 16, 2019 1:27 am

Web Title: champions league football