लिआँने युरोपियन फुटबॉलवरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करताना महिलांच्या चॅम्पियन्स लीग फुटबॉलचे सलग पाचव्यांदा विजेतेपद मिळवले. रविवारी मध्यरात्री झालेल्या अंतिम फेरीत लिआँने वोल्फ्सबर्गला ३-१ अशी धूळ चारली.
स्पेनमधील रिले एरिना येथे झालेल्या सामन्यात लिआँने सुरुवातीपासून आक्रमणावर भर दिला. एग्युइन सॉमरने २५व्या मिनिटाला पहिला, तर साकी कुमागाइने ४४व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवून लिऑनला मध्यंतरापूर्वीच २-० अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात अॅलेक्झांड्रा पॉपने (५७वे मि.) गोल झळकावून वोल्फ्सबर्गला पुनरागमनाच्या आशा दाखवल्या. परंतु ८८व्या मिनिटाला सारा गर्नस्डॉटने निर्णायक तिसरा गोल झळकावून लिआँच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 1, 2020 12:29 am