अखेरच्या क्षणी तीन मिनिटांत दोन गोल केल्यामुळे पॅरिस सेंट जर्मेनने अ‍ॅटलांटावर २-१ असा थरारक विजय मिळवत चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे.

लिस्बन येथे बुधवारी रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फे रीच्या या सामन्यात मारियो पलासिकने २६व्या मिनिटालाच गोल करत अ‍ॅटलांटाला आघाडी मिळवून दिली. ९०व्या मिनिटापर्यंत हीच आघाडी कायम असल्यामुळे अ‍ॅटलांटाचा विजय अपेक्षित होता. पण मार्किन्होस याने ९०व्या मिनिटाला गोल करत पॅरिस सेंट जर्मेनला बरोबरी साधून दिली. त्यानंतर तीन मिनिटांनी एरिक मॅक्सिम चोउपो-मोटिंग याने शानदार गोल झळकावत पॅरिस सेंट जर्मेनच्या विजयावर शिक्कामोर्तब के ले. त्यामुळे युरोपियन चषक मायदेशी घेऊन जाण्याचे अ‍ॅटलांटाचे स्वप्न धुळीस मिळाले.

युरोपातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या आणि करोनाचा तडाखा बसलेल्या अमेरिके तील छोटय़ाशा शहरातील अ‍ॅटलांटा क्लबने आपल्या चाहत्यांचा आनंद द्विगुणित करण्याचे ठरवले होते. पण अखेरच्या क्षणी त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने संघातील खेळाडू निराश झाले आहेत.

‘‘पराभवाच्या खूप वेदना होत आहेत. संघासाठी आणि चाहत्यांसाठी एक सुखद बातमी आम्ही देऊ शकलो असतो. पण पराभवाने आम्ही निराश झालो आहोत. बेर्गामो येथे परतल्यानंतर आम्ही चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले असले तरी पराभवाचे शल्य कायम बोचत राहील,’’ असे अ‍ॅटलांटाचा मध्यरक्षक मार्टेन डेरून याने सांगितले.

२५ २५ वर्षांनी प्रथमच पॅरिस सेंट जर्मेनने चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठली. यापूर्वी १९९४-९५मध्ये त्यांनी अशी कामगिरी केली होती.

४ ९० मिनिटांपर्यंत आघाडीवर असूनही भरपाई वेळेत सामना गमावणारा अटलांटा हा चॅम्पियन्स लीगमधील चौथा संघ ठरला आहे.