20 September 2020

News Flash

नॉर्दर्नच्या विजयात विल्यम्सन चमकला

केन विल्यम्सनच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर नॉर्दर्न ड्रिस्ट्रिक्ट्स संघाने चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेत डकवर्थ-लुइस पद्धतीद्वारे केप कोब्राज संघावर ३३ धावांनी विजय मिळवला.

| September 20, 2014 05:17 am

केन विल्यम्सनच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर नॉर्दर्न ड्रिस्ट्रिक्ट्स संघाने चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेत डकवर्थ-लुइस पद्धतीद्वारे केप कोब्राज संघावर ३३ धावांनी विजय मिळवला.
नॉर्दर्न संघासाठी अँटॉन डेव्हविच आणि विल्यम्सन यांनी १४० धावांची खणखणीत सलामी दिली. डेव्हविचने ६७ धावा केल्या. ब्रॅडले वॉटलिंगने २० चेंडूत ३२ धावांची खेळी करत विल्यम्सनला चांगली साथ दिली. विल्यम्सनने नाबाद १०१ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल केप कोब्राजची सुरुवात खराब झाली. स्टॅअिन व्हॅन झायल भोपळाही फोडू शकला नाही. हशीम अमला २० धावा करून तंबूत परतला. २ बाद ४४ अशी स्थिती असताना पावसाचे आगमन झाले. पावसाचा जोर वाढतच गेल्याने डकवर्थ-लुइस पद्धतीद्वारे नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाला विजयी घोषित करण्यात आले. विल्यम्सनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 5:17 am

Web Title: champions league t20 2014 clt20 kane williamsons ton leads northern knights nk
Next Stories
1 शल्य न मिळणाऱ्या पदकांचे!
2 जितू, अभिनववर पदकाच्या आशा नेमबाजी
3 सायना, सिंधूवर मदार
Just Now!
X