28 January 2020

News Flash

आयपीएलमुळे चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेवर गंडांतर

आयपीएल फिक्सिंगच्या निकालाचा फटका चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेला बसला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात होणाऱया चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक

| July 15, 2015 01:19 am

आयपीएल फिक्सिंगच्या निकालाचा फटका चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेला बसला आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात होणाऱया चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) घेतला आहे. चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या गर्व्हनिंग कौंसिलनेही यास दुजोरा दिला आहे.
यंदाच्या चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० साठी धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपरकिंग्ज संघ पात्र झाला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीने मंगळवारी आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा निकाल देताना चेन्नई सुपरकिंग्ज संघावर दोन वर्षांची बंदी घातली. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्जचा चॅम्पियन्स लीगमध्ये खेळणार का?, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर बीसीसीआय़ने चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० ही संपूर्ण स्पर्धाच रद्द करण्याचा निर्णय जाहीर करून धक्का दिला आहे.
भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक ट्वेन्टी-२० स्पर्धांना एकत्र आणणाऱया चॅम्पियन्स ट्वेन्टी-२० स्पर्धेतून आजवर अनेक खेळाडूंना त्यांच्यातील गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय़ घेणे अतिशय कठीण जात आहे, असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. स्पर्धेचे गेले सहा मोसम यशस्वीरित्या पार पडले मात्र, या स्पर्धेला अपेक्षित लोकप्रियता मिळाली नसल्याचे ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कारण अनुराग ठाकूर यांनी दिले आहे. असे असले तरी आयपीएल स्पॉट फिक्सिंगमुळे चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेला फटका बसल्याचीही चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.
दरम्यान, चॅम्पियन्स लीग स्पर्धा क्रिकेट ऑस्ट्रेलिया, क्रिकेट साऊथ आफ्रिका आणि बीसीसीआय यांचा संयुक्त उपक्रम आहे. या स्पर्धेत आयपीएलमधील चार संघ, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेतील दोन तसेच दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक ट्वेन्टी-२० स्पर्धेतील दोन संघ यांच्यासह श्रीलंका, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंडमधील ट्वेन्टी-२० संघ सहभागी होतात. मात्र तुलनेने अपरिचित खेळाडू, प्रमुख भारतीय खेळाडूंची अनुपस्थिती यामुळे सुरुवात झाल्यापासून या स्पर्धेला प्रायोजकांचा आणि प्रेक्षकांचा पाठिंबा लाभला नाही. त्यामुळे मध्यंतरी या स्पर्धेचा कायापालट करून या स्पर्धेला मिनी आयपीएलचे रुप देण्याच विचार बीसीसीआय करीत असल्याचेही समोर आले होते.

First Published on July 15, 2015 1:19 am

Web Title: champions league t20 to be discontinued
टॅग Ipl
Next Stories
1 साक्षी, अनिकेतकडे भारताचे कर्णधारपद
2 ‘अजिंक्य’ भारत!
3 न्यायालयाच्या निर्णयात त्रुटी- राज कुंद्रा
Just Now!
X