प्रमुख खेळाडूंनी आयपीएल संघांना प्राधान्य दिल्यामुळे कमकुवत झालेल्या ब्रिस्बेन हीट आणि त्रिनिदाद अॅन्ड टोबॅगो यांच्यात रांची येथे रविवारी तोलामोलाचा मुकाबला रंगणार आहे.
वेगवान गोलंदाज केमार रोच, फिरकीपटू नॅथन हॉरित्झ, अष्टपैलू डॅनीयल ख्रिस्तियन आणि जेम्स होप्स यांच्यावर ब्रिस्बेन संघाची भिस्त आहे. युवा फलंदाज ख्रिस लिनकडून ब्रिस्बेनला मोठय़ा अपेक्षा आहेत.
भारतीय उपखंडात खेळण्याचा अनुभव या चौकडीकडे आहे. दुसरीकडे सुनील नरिन त्रिनिदादसाठी हुकमी एक्का असणार आहे. दिनेश रामदीन, रवी रामपॉल आणि डॅरेन ब्राव्हो या अनुभवी खेळाडूंवर मोठी जबाबदारी आहे. सल्लागार म्हणून त्रिनिदादसोबत असलेल्या महान खेळाडू ब्रायन लाराचा अनुभव संघाला उपयुक्त ठरू शकेल.
वेळ : दुपारी ४ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट, स्टार स्पोर्ट्स
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 22, 2013 4:46 am