इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्रशासकीय समितीची बुधवारी बैठक होणार असून, या बैठकीत चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचे भवितव्य आणि चेन्नई सुपर किंग्जचे वादग्रस्तरीत्या झालेले मूल्यांकन हे दोन महत्त्वाचे विषय असतील.
प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या या स्पध्रेबाबत पुरस्कर्ते आणि प्रेक्षकांची अनुत्सुकता आहे. प्रशासकीय समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स लीग आहे त्या स्थितीत चालू ठेवणे, ती बंद करणे किंवा अन्य स्वरूपात सादर करणे याबाबत बैठकीत चर्चा होईल. याचप्रमाणे चेन्नई सुपर किंग्जचे पाच लाख रुपये वादग्रस्तरीत्या मूल्यांकन करण्याचा मुद्दा या वेळी चर्चेत आला. एप्रिलमध्ये झालेल्या प्रशासकीय समितीच्या पहिल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. त्या वेळी याबाबत कायदेशीर सल्ला घेण्याचे बीसीसीआयने निश्चित केले होते.