कोलंबो : चेंडू फेरफारप्रकरणी झालेल्या बंदीच्या शिक्षेनंतर दिनेश चंडिमलचे श्रीलंकेच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेविरुद्ध एकमेव ट्वेन्टी-२० सामना कोलंबो येथे मंगळवारी होणार असून, या सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली.

२८ वर्षीय चंडिमल बंदीमुळे दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकला होता. ही मालिका श्रीलंकेने जिंकली. त्यानंतर पहिल्या चार एकदिवसीय सामन्यांमध्येसुद्धा तो खेळू शकला नाही. या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना रविवारी होणार असला तरी चंडिमलची संघात निवड झालेली नाही.

श्रीलंकेचा संघ

अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), दसून शनाका, कुशल परेरा, धनंजय डी’सिल्व्हा, उपूल थरंगा, कुशल मेंडिस, थिसारा परेरा, शेहान जयसूर्या, शेहान मडूशंका, लाहिरू कुमारा, दिनेश चंडिमल, अकिला धनंजय, जेफ्री वांदरसे, लक्षण संदाकान, बिनुरा फर्नाडो.