News Flash

‘चेन्नई हा विशेष संघ – विजय

आयपीएल’च्या पहिल्या हंगामापासून सर्वोत्तम खेळाडूंचा भरणा या संघात पाहायला मिळ

भारताचा अनुभवी सलामीवीर मुरली विजय याने चेन्नई सुपर किंग्ज हा इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) विशेष असा संघ आहे, असे कौतुकोद्गार काढले आहेत.

‘‘चेन्नई हा विशेष संघ आहे. ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामापासून सर्वोत्तम खेळाडूंचा भरणा या संघात पाहायला मिळतो. देशातील खेळाडूंप्रमाणेच गुणवान परदेशी खेळाडूदेखील संघाला सुरुवातीपासून लाभले. महान खेळाडूंचा समावेश असलेला असा हा चेन्नई संघ आहे. या संघाच्या ड्रेसिंगरूममध्ये वावरणे हेदेखील अभिमानास्पद वाटते. या संघातील  सर्वोत्तम खेळाडूंसोबत चर्चा करणे, त्यांच्यासोबत खेळणे यातून भरपूर काही शिकायला मिळते,’’ असे विजयने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:05 am

Web Title: chennai special team says murali vijay abn 97
Next Stories
1 जेव्हा शमी लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मजुराचा जीव वाचवतो…
2 लॉकडाउनमुळे जगभरात क्रिकेट ठप्प, तरीही भारतीय महिला २०२१ विश्वचषकासाठी पात्र
3 सगळ्यात चांगला मित्र कोण, रोहित की विराट? मोहम्मद शमी म्हणतो…
Just Now!
X