सध्या देश लॉकडाउनमध्ये आहे. करोना विषाणूने सध्या जगभरात दहशत निर्माण केली आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतातील लोकप्रिय IPL स्पर्धादेखील अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पण या दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काही भारतीय क्रिकेटर्स एकत्र असलेला एक जुना फोटो शेअर केला आहे.

“कोणीही धोनीच्या रूममध्ये जावं, काहीही खायला मागवावं आणि…”; नेहराने सांगितला धमाल अनुभव

खेळाडूंचा हा फोटो २००५ सालचा म्हणजेच १५ वर्षे जुना आहे. खेळाडूंचा हा फोटो श्रीलंकेत टीम इंडिया दौऱ्यावर असताना क्लिक करण्यात आला होता. या फोटोमध्ये काही लोकप्रिय चेहरे आहेत, पण काही असेही चेहरे आहेत जे ओळखण्यासाठी डोक्यावर थोडा जोर द्यावा लागेल. चेन्नई सुपर किंग्जने २००५ मध्ये श्रीलंका दौर्‍याचा फोटो शेअर केला. हा फोटो शेअर करताना, CSK ने कॅप्शन दिले आहे, ‘मेन इन ब्लू, येलो लव्हच्या (सीएसकेची जर्सी) आधी ग्रे (राखाडी) च्या वेगवेगळ्या शेड्स या फोटोत दाखवतात. हेच खरं ‘सोनं’ आहे.

“विराट सर्वोत्तम वाटणाऱ्यांनी बाबर आझमची फलंदाजी बघा”

पाहा फोटो –

भारतीय क्रिकेटला सध्या ‘या’ गोष्टीची गरज – धोनी

“भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूची मानसिक शक्ती थोडीशी कमी पडते हे सत्य अजूनपर्यंत खूप लोकांना मान्य नाही. आपण खेळाडूंच्या त्या आजाराला सरसकट मानसिक ताण ठरवतो. अनेकदा फलंदाज खेळपट्टीवर जातो, तेव्हा पहिल्या पाच ते १० चेंडूंचा सामना करताना तो थोडासा घाबरलेला असतो. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने पडत असतात. कोणीच हे उघडउघड मान्य करत नाही, पण सगळ्यांनाच तसं वाटत असतं. अशा परिस्थितीत काय करावं? खरं तर ही खूप छोटी समस्या आहे, पण काही खेळाडू प्रशिक्षकाला हे सांगायलाही घाबरतात. कोणत्याही खेळात खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यात चांगलं नातं आवश्यक असतं”, असं धोनीने एका कार्यक्रमात सांगितले.