गँड्रमास्टर रमेश यांची टीका

चेन्नई : पदकविजेते खेळाडू घडवूनही देशातील बुद्धिबळ प्रशिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कारांपासून वंचित ठेवण्यात येते. सरकारकडून बुद्धिबळ प्रशिक्षकांना कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन अथवा ओळख मिळत नाही, अशी टीका अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे (एआयसीएफ) माजी निवड समिती प्रमुख तसेच ग्रँडमास्टर आर. बी. रमेश यांनी के ली आहे.

चेन्नईस्थित रमेश यांनी आर. प्रज्ञानंद, त्याची बहीण वैशाली तसेच राष्ट्रीय विजेता अरविंद चिदंबरम आणि कार्तिके यन मुरली यांच्यासारखे अव्वल बुद्धिबळपटू घडवले आहेत. ‘एआयसीएफ’मधील गटबाजीला वैतागून रमेश यांनी काही दिवसांपूर्वीच निवड समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ‘‘भारतीय संघाचा किंवा भारतीय खेळाडूंचा प्रशिक्षक या नात्याने केंद्र सरकारकडून कोणताही पुरस्कार दिला गेलेला नाही. गेल्या १५ वर्षांत देशाला अनेक पदके  आणि अव्वल खेळाडू देऊनही केंद्र सरकारने प्रशिक्षक म्हणून कोणताही पुरस्कार मला दिलेला नाही,’’ अशी टीका रमेश याने के ली आहे.

‘‘जागतिक युवा स्पर्धामध्ये ३४, आशियाई युवा स्पर्धामध्ये ४०, राष्ट्रकुल स्पर्धेत २३, राष्ट्रीय विजेतेपदे ३६, आशियाई स्पर्धामध्ये ५, तर ऑलिम्पियाडमध्ये कांस्यपदक मिळवूनही माझ्या कामगिरीची कु णी दखलही घेतली नाही. हेच केंद्र सरकारचे क्रीडा धोरण आहे का? ’’ असा सवालही त्याने केला आहे.