ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय संघाने चौथ्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवला. कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास रचला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अनुभवी चेतेश्वर पुजारावर अनेक प्रहार करण्याचे प्रयत्न केले. मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या तीन वेगवान गोलंदाजांनी सातत्याने पुजाराच्या शरीराच्या जवळपास मारा केला. चेंडूला मिळणारी उसळी पाहता अनेक चेंडू पुजाराने अंगावर खाल्ले. स्वत:ची विकेट वाचवताना खांद्याजवळ, हाताच्या बोटाला, हेल्मेटवर अशा विविध ठिकाणी चेंडू अंगावर झेलले. पण एखाद्या भिंतीप्रमाणे अभेद्य असा तो यजमान संघापुढे उभा राहिला. त्याला चेंडू लागण्याच्या प्रकाराबद्दल त्याच्या लेकीने एक गोड उपाय सांगितला.

बुमराहचं भावनिक ट्विट; म्हणाला, “तू नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील…”

पुजारा मैदानात असताना त्याची २ वर्षांनी चिमुरडी लेक टीव्हीवर सामना पाहत होती. मालिका संपल्यानंतर पुजाराने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखीदरम्यान आपल्या मुलीबद्दलची एक गोष्ट सांगितली. बाबा झालेल्या जखमा बऱ्या करण्यासाठी तिने भन्नाट उपाय शोधून काढल्याचं पुजारा म्हणाला. पुजाराने सांगितले की, माझी मुलगी आदिती म्हणाली होती की जिथे जिथे बाबांना जखमा झाल्या आहेत, तेथे मी पाप्या देईन. म्हणजे त्यांचा त्रास कमी होईल आणि माझ्या पाप्या पेन कीलरचं काम करतील.

Video: सामना सुरू असताना २० वर्षीय कबड्डीपटूचा मृत्यू

“ती खेळत असताना जेव्हा धडपडते आणि तिला काही लागतं तेव्हा मी तिला पापा देतो. त्यामुळे तिला असं वाटतं की पापा दिला की सगळ्या जखमा बऱ्या होतात. म्हणून तिने माझ्या जखमा बऱ्या करण्यासाठी हा उपाय शोधून काढलाय”, असंही पुजाराने स्पष्ट केला. पुजाराने चौथ्या सामन्यात दमदार कामगिरी केली. चौथ्या डावात तो भिंतीसारखा उभा राहिला आणि त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची हवाच काढून टाकली. पुजाराने २११ चेंडू खेळून काढले. त्यात त्याने ७ चौकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली.