News Flash

मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराची शतकी खेळी

भारत मजबूत स्थितीत हैदराबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील २३७ धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागला या सामन्यातही सुर

| March 3, 2013 04:49 am

मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराची शतकी खेळी

भारत मजबूत स्थितीत
हैदराबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुस-या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील २३७ धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागला या सामन्यातही सुर गवसला नाही. सेहवाग ६ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर मुरली विजय आणि चेतेश्वर पुजाराने दमदार फलंदाजी करत आपले शतक साजरे केले. या दोन्ही युवा फलंदाजांच्या जोरावर भारताची धावसंख्या ३११/१ अशी आहे. वीरेंद्र सेहवाग बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा डाव कोसळतो की काय ? अशी चिन्हे हैदराबाद स्टेडियमवर जमलेल्या प्रेक्षकांच्या चेह-यावर दिसत होती. पण संघाचा डाव सांभाळत पुजारा आणि मुरली विजयने शतक गाठले आणि स्टेडियमवर जल्लोष सुरू झाला. संघाचा कर्णधार मायकल क्लार्कला वगळता ऑस्टेलियाच्या फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीही लडखडताना दिसत आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2013 4:49 am

Web Title: cheteshwar pujara and murali vijay makes hundred
Next Stories
1 काय पो छे!
2 दिसं जातील, दिसं येतील..
3 भारताच्या महान खेळाडूंमध्ये धोनीची गणना असेल -जोन्स
Just Now!
X