आंतराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने(आयसीसी) आज सोमवार जाहीर केलेल्या क्रमवारीत पहिल्या दहा उत्तम कसोटी फलंदाजांमध्ये भारताचा चेतेश्वर पुजारा याला सहावे स्थान देण्यात आले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारित पहिल्या वीस फलंदाजांमध्ये चेतेश्वर पुजारा व्यतिरिक्त एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. तर, उत्तम कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत आर.अश्विनच्या स्थानात घसरण होऊन अश्विनला आठवे स्थान मिळाले आहे. त्यानंतर जहीर खान १७व्या स्थानावर आहे.
इंग्लंडच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले इयान बेल, ज्यो रूट हे फलंदाज आणि गोलंदाज गॅमी स्वॉन यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. इयान बेलने क्रमवारीत अकरावे स्थान प्राप्त केले आहे.