17 January 2021

News Flash

चेतेश्वर पूजारा इतका संथ खेळू शकत नाही, प्रग्यान ओझाची टीका

तुम्ही इतकी संथ फलंदाजी करु शकत नाही. क्रिकेट आता बदलले आहे.

चेतेश्वर पूजारा म्हणजे कसोटी क्रिकेटमधील भरवशाचा फलंदाज. याच चेतेश्वर पूजाराला सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत संघर्ष करावा लागत आहे. मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात अपयशी ठरल्यानंतर तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात चेतेश्वर पूजाराने अर्धशतक झळकावले खरे पण त्याच्या फलंदाजीचा वेग संथ होता. भारताचा माजी फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझानुसार, सिडनी कसोटीवर वर्चस्व मिळवण्याचा इरादा पूजाराच्या फलंदाजीमध्ये दिसला नाही.

पूजाराने कसोटी क्रिकेटमधील संथ अर्धशतक झळकावले. त्यासाठी त्याने १७६ चेंडू घेतले. ५० धावांवर पॅट कमिन्सने त्याला झेलबाद केले. सकाळच्या सत्रात ९६ धावांवरुन पुढे सुरुवात करताना, पूजारा आणि कर्णधार रहाणेने सावध सुरुवात केली. डावाला चालना देण्याचा आवेश दोघांच्या फंलदाजीत दिसला नाही. २२.४ षटकात पूजारा आणि रहाणेने फक्त ३२ धावा केल्या.

रोहित शर्मा आणि शुभमन गिलने बिनबाद ७० धावा धावफलकावर लावल्या होत्या. संध्याकाळच्या सत्रात खेळ खूपच संथ झाला आणि आपण चालना हरवून बसलो. त्यानंतर ऑस्ट्रेलियन चांगली रणनिती घेऊन मैदानात उतरले. बाऊन्सर चेंडू टाकून खेळाची लय बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यात ते यशस्वी सुद्धा झाले असे प्रग्यान ओझा स्पोटर्स टुडेशी बोलताना म्हणाला.

“चेतेश्वर पूजारा संघातील एक वरिष्ठ सदस्य आहे. त्याच्या खेळामध्ये इरादा दिसायला हवा होता. २०१८ मध्ये मालिका जिंकण्यासाठी त्याने आम्हाला प्रोत्साहित केले होते. पण आता प्रत्येक जण त्याच्या उद्देशाबद्दल प्रश्न विचारत आहेत. तुम्ही इतकी संथ फलंदाजी करु शकत नाही. क्रिकेट आता बदलले आहे” असे ओझा म्हणाला.

“तुम्ही कसोटी सामना खेळताय. लोक एका ठराविक स्ट्राइक रेटने फलंदाजी करतात. तुम्हाला तुमच्या खेळात तो वेग टिकवता आला पाहिजे. तुम्ही त्यापेक्षा संथ खेळलात तर संघावर त्याचा परिणाम होतो” असे प्रग्यान ओझा म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 4:13 pm

Web Title: cheteshwar pujara cant bat so slow has to show more intent says pragyan ojha dmp 82
Next Stories
1 IND vs AUS: ऋषभ पंतच्या जागी वृद्धिमान साहा मैदानात; भन्नाट मीम्स व्हायरल
2 IND vs AUS: ‘टीम इंडिया’ला मोठा धक्का! पंतपाठोपाठ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3 ऑस्ट्रेलियाने बाजी पलटवली; सिडनी कसोटीत कांगारुंकडे १९७ धावांची आघाडी
Just Now!
X