11 December 2017

News Flash

चेतेश्वर पुजाराचे पहिले द्विशतक

मोटेरा येथील सरदार वल्लबभाई स्टेडियमवर इंग्लंडविरुध्द कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराने ३७४ चेंडूत आपल्या

अहमदाबाद | Updated: November 16, 2012 3:13 AM

मोटेरा येथील सरदार वल्लबभाई स्टेडियमवर इंग्लंडविरुध्द कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराने ३७४ चेंडूत आपल्या कारकीर्दीतले पहिले द्विशतक झळकावले. नाणेफेक जिंकून भारताने काल (गुरुवार) प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पुजारा पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा नाबाद ९८ धावांवर खेळत होता. आज भोजनाच्या आधी पुजाराने १९० चेंडूत १४ चौकारांच्या सहाय्याने आपले दुसरे शतक झळकावले. चेतेश्वर पुजाराने संयमी खेळी करत ३७४ चेंडूत शानदार द्विशतक झळकाविले आहे. त्यामध्ये २१ चौकारांचा समावेश आहे. भारताचा पहिला डाव  ८ बाद ५२१ धावांवर घोषित करण्‍यात आला आहे.

First Published on November 16, 2012 3:13 am

Web Title: cheteshwar pujara completes test first double century