News Flash

वन-डे आणि टी-20 संघात जागा मिळवण्याबाबत पुजारा अजुनही आशादायी

रेल्वेविरुद्ध टी-20 सामन्यात पुजाराचं शतक

सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत पहिलं शतक झळकावत चेतेश्वर पुजाराने सर्व टीकाकारांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. नाबाद 100 धावांची खेळी करणाऱ्या पुजाराने रेल्वेच्या गोलंदाजांची धुलाई केली. कसोटी क्रिकेटचा खेळाडू असा शिक्का बसलेल्या पुजाराला गेली काही वर्ष वन-डे आणि टी-20 संघाता जागा मिळात नाहीये. आयपीएलमध्येही कोणत्याच संघाने पुजाराला आपल्या संघात दाखल करुन घेण्यात स्वारस्य दाखवलं नाही. मात्र रेल्वेविरुद्ध सामन्यात शतक झळकावत पुजाराने आपण अजुनही मर्यादीत षटकांचं क्रिकेट खेळू शकतो हे दाखवून दिलं.

“किमान दोन वेळा मला माझ्यावर आयपीएलमध्ये कोणीही बोली लावली नाही. मी लिलावासाठी माझं नाव दिलं होतं कारण मी अजुनही वन-डे, टी-20 क्रिकेट खेळू शकतो याची मला खात्री होती. जर माझी निवड झाली नाही तर मी फारसं मनाला लावून घेत नाही. मात्र अशाप्रकारे खेळी केल्यास कदाचीत माझ्या या खेळीची दखल घेतली जाईल. आयपीएलमध्ये संघमालक माझी दखल घेतली. मात्र माझ्याबद्दलची मत कोणी बदलावीत यासाठी आता मला प्रयत्न करायचे नाहीयेत”, पुजारा पत्रकारांशी बोलत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 1:02 pm

Web Title: cheteshwar pujara opens up on indian premier league ipl snub post maiden t20 century for saurashtra
टॅग : Cheteshwar Pujara
Next Stories
1 World Cup 2019 : ‘पाकशी न खेळणं शरणागतीपेक्षाही वाईट’
2 पाकविरुद्ध खेळण्याचा निर्णय BCCI घेईल – चहल
3 पाकविरुद्ध क्रिकेट न खेळण्याचा भारताला पूर्णपणे अधिकार – शोएब अख्तर
Just Now!
X