सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेटमध्ये शतकी खेळी झळकावत चेतेश्वर पुजाराने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. कसोटी क्रिकेटचा फलंदाज अशी ओळख बनलेल्या पुजाराने सौराष्ट्राकडून खेळताना रेल्वेविरुद्ध शतकी खेळी केली. टी-20 क्रिकेटमधलं पुजाराचं हे पहिलं शतक ठरलं आहे. या खेळीसह पुजाराने रोहित शर्मा, सेहवाग यांच्यासारख्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवलं आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक, ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये दीड शतक आणि टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा चौथा खेळाडू ठरला आहे.
Indians with a 300+ in First-class, 150+ in List A cricket & 100 in Twenty20s:
Virender Sehwag
Rohit Sharma
Mayank Agarwal
CHETESHWAR PUJARAOnly Mayank and Pujara have FC 300, List A 150, T20 100 in Indian domestic tournaments. #MushtaqAliT20 #RLWvSAU
— Sampath Bandarupalli (@SampathStats) February 21, 2019
मात्र त्याची शतकी खेळी सौराष्ट्राला विजय मिळवून देऊ शकली नाही. रेल्वेने सौराष्ट्राचं दिलेलं 189 धावांचं आव्हान 5 गडी राखून पूर्ण केलं.
अवश्य वाचा – विश्वास ठेवा, हे खरं आहे ! चेतेश्वर पुजाराचं टी-20 क्रिकेटमध्ये शतक
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 4:05 pm