News Flash

Videos: चेतेश्वर पुजारा The Wall- कांगारुंच्या शरीरभेदी माऱ्याला पुरून उरणारा भारतीय!

पुजाराच्या झुंजार वृत्तीचे सर्वत्र कौतुक

दुसऱ्या डावाअखेरीस ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चहापानापर्यंत ३ बाद १८३ धावांपर्यंत मजल मारली. खेळपट्टीवर स्थिरावलेला शुबमन गिल शतकापासून ९ धावा दूर असताना बाद झाला. कर्णधार अजिंक्य रहाणे धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चेतेश्वर पुजारावरही अनेक प्रहार करण्याचे प्रयत्न केले. पण कांगारुंच्या शरीरभेदी माऱ्याला पुजारा पुरून उरला.

मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या तीन वेगवान गोलंदाजांनी सातत्याने पुजाराच्या शरीराच्या जवळपास मारा केला. चेंडूला मिळणारी उसळी पाहता अनेक चेंडू पुजाराने अंगावर खाल्ले. स्वत:ची विकेट वाचवताना एक चेंडू पुजाराच्या खांद्याजवळ येऊन आदळला. एक चेंडूच्या उसळीमुळे पुजाराच्या बोटाला प्रचंड वेदना झाल्या. एक चेंडू तर अतिशय जोरदार उसळी घेऊन थेट त्याच्या हेल्मेटवर आदळला. चेंडूच्या वेगाने हेल्मेटची क्लिप निघून जमिनीवर पडली. पण अनेकविध फटके अंगावर झेलून पुजाराने अतिशय शांतपणे फलंदाजी सुरू ठेवली. एखाद्या भिंतीप्रमाणे अभेद्य असा तो यजमान संघापुढे उभा राहिला. त्याच्या याच गुणामुळे त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

आणखी वाचा- शुबमन गिलचा धमाका! मोडला सुनील गावसकरांचा ५० वर्ष जुना विक्रम

पुजारावर शरीरभेदी मारा, पाहा काही व्हिडीओ-

दरम्यान, दरम्यान, पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतल्यावर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४वर आटोपला. स्टीव्ह स्मिथने दमदार अर्धशतक (५५) ठोकलं. डेव्हिड वॉर्नर (४८), मार्कस हॅरिस (३८) आणि कॅमेरॉन ग्रीन (३७) या तिघांनीही चांगल्या छोटेखानी खेळी केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला २९४ धावांपर्यंत मजला मारता आली आणि त्यांनी भारताला ३२८ धावांचे लक्ष्य दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 10:46 am

Web Title: cheteshwar pujara the wall of team india stands still even after many blows on body see viral videos ind vs aus vjb 91
Next Stories
1 ‘अजिंक्य’ भारत! ‘गाबा’वर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पराभव; पंत-गिलची दमदार फलंदाजी
2 IND vs AUS : ऋषभ पंतनं मोडला धोनीचा विक्रम
3 IND vs AUS: सामना रंगतदार अवस्थेत; भारताची भिस्त पुजारावर
Just Now!
X