News Flash

IND vs ENG : भारताला मोठा धक्का, चेतेश्वर पुजारा दुखापतग्रस्त

दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही

चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी अनुभवी चेतेश्वर पुजारा दुखापतग्रस्त झाला. उजव्या हाताला दुखापत झाल्यामुळे चेतेश्वर पुजारा दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. बीसीसीआयनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर याबाबतची माहिती दिली आहे.

दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजाराऐवजी क्षेत्ररक्षणासाठी मयांक अगरवाल मैदानात उतरला होता. पहिल्या दिवशी फलंदाजीदरम्यान पुजाराला दुखापत झाली होती. पुजाराची दुखापत कितपत गंभीर आहे याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही. पण तिसऱ्या डे-नाईट कसोटी सामन्यात अनुभवी पुजाराची भारतीय संघाला गरज लागेल. पुजाराची जुखत गंभीर नसली तरीही संघ व्यवस्थापनानं काळजी म्हणून पुजाराला आराम देण्याचा निर्णय घेतला.

चेन्नई येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पुजारानं ५८ चेंडूचा सामना करताना २१ धावांची छोटेखानी खेळी केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल शून्य धावसंख्येवर बाद झाल्यानंतर पुजारा मैदानात उतरला होता. पुजारानं रोहित शर्मासोबत दुसऱ्या गड्यासाठी ८५ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. भारतीय संघानं पहिल्या डावांत ३२९ धावांपर्यंत मजल मारली आहे. प्रत्त्युत्तर इंग्लंड संघानं ८७ धावांत ६ गडी गमावले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 1:22 pm

Web Title: cheteshwar pujara was hit on his right hand while batting second test nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 रोहितच्या तुफानी फलंदाजीचे इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून कौतुक, म्हणाला…
2 IND vs ENG: भारतीय फलंदाजांच्या बाबतीत घडला ‘हा’ अजब योगायोग
3 अक्षर पटेलनं मोठा अडथळा केला दूर, जो रुटला अडकवलं जाळ्यात
Just Now!
X