News Flash

छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पर्धा : पुरुषांमध्ये ठाणे, तर महिलांमध्ये पुणे अजिंक्य

चुरशीच्या लढतीत ठाणे संघाने मुंबई शहर संघाचा १७-११ असा पराभव करीत छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील पुरुष गटाच्या अजिंक्यपदावर नाव कोरले.

| February 20, 2014 04:38 am

छत्रपती शिवाजी करंडक कबड्डी स्पर्धा : पुरुषांमध्ये ठाणे, तर महिलांमध्ये पुणे अजिंक्य

चुरशीच्या लढतीत ठाणे संघाने मुंबई शहर संघाचा १७-११ असा पराभव करीत छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील पुरुष गटाच्या अजिंक्यपदावर नाव कोरले. महिलांमध्ये पुणे संघाने मुंबई शहर संघावर २६-११ असा सफाईदार विजय मिळवत जेतेपद प्राप्त केले.  महिलांमध्ये पुण्याची शिवनेरी चिंचवले हिला तर पुरुषांमध्ये ठाण्याचा गिरीश इरनाकला  स्पध्रेतील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
पुरुष गटाच्या अंतिम लढतीत ठाणे संघाने मुंबई शहरविरुद्ध पूर्वार्धात ७-६ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात ठाणे संघाच्या गिरीश इरनाक व सूरज बनसोडे यांनी जोरदार चढाया करत संघाला विजयश्री मिळवून दिली. मात्र दोन्ही संघांनी आपली ताकद अजमावण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा सामना काहीसा कंटाळवाणा झाला. मुंबईच्या दीपक झझोटचा खेळ संघाचा पराभव टाळू शकला नाही.
महिलांमध्ये पुणे संघाकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. त्यानुसारच त्यांनी खेळ करीत मुंबईचा सहज पराभव केला. त्याचे श्रेय सायली केरीपाळे, शिवनेरी चिंचवले व पूजा शेलार यांच्या चौफेर चढायांना द्यावे लागेल. रेणुका तापकीर हिने सुरेख पकडी करीत पुण्याच्या यशाची शान वाढविली. मुंबईच्या स्नेहल साळुंके व रेखा सावंत यांनी खोलवर चढाया करीत चांगली लढत दिली, मात्र त्यांना अन्य खेळाडूंची अपेक्षेइतकी साथ लाभली नाही. मुंबईची अनुभवी खेळाडू सुवर्णा बारटक्केला पकडी व चढायांमध्ये प्रभाव दाखविता आला नाही. स्पर्धेचा पारितोषिक वितरण
समारंभ राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसेपाटील यांच्या हस्ते झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2014 4:38 am

Web Title: chhatrapati shivaji cup kabaddi tournament thane win men and pune win women title
Next Stories
1 द.आफ्रिकेतील गोल्फ स्पर्धेतून जीव मिल्खा सिंगची दुखापतीमुळे माघार
2 नदालची विजयी सलामी
3 जागतिक मोटार रॅली मानांकनात संजय टकलेंना ६४वे स्थान