22 October 2020

News Flash

बालपणीच्या प्रशिक्षकांशी दुरावा पथ्यावर -मनिका

लहानपणीचे प्रशिक्षक संदीप गुप्ता यांच्याशी नातेसंबंध तोडल्याच्या निर्णयाने मला माझ्या कारकीर्दीमध्ये खूप फायदा झाला आहे,

(संग्रहित छायाचित्र)

लहानपणीचे प्रशिक्षक संदीप गुप्ता यांच्याशी नातेसंबंध तोडल्याच्या निर्णयाने मला माझ्या कारकीर्दीमध्ये खूप फायदा झाला आहे, असे मत भारताची आघाडीची महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राने व्यक्त केले.

२४ वर्षीय मनिकाचे प्रशिक्षक संदीप गुप्ता यांना ऑगस्ट महिन्यात द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सध्या मनिका ही सन्मय परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. त्यांच्याकडून ती खेळातील अनेक बारकावे शिकून घेत आहे.

टेबल टेनिसच्या जागतिक क्रमवारीमध्ये गेल्या दोन महिन्यांत मनिकने ६१ व्या स्थानावर झेप घेतली आहे. जर्मन आणि स्वीडन खुल्या स्पर्धेत मनिकाचे आव्हान लवकरच संपुष्टात आले होते.

‘‘माझा खेळ आणि हालचालींबाबत मी अधिक आश्वस्त आहे. सध्या माझ्या खेळात सुधारणा होत आहे. सध्या पुण्यात मी सराव करत असून तेथील वातावरण खूपच सकारात्मक असून माझे प्रशिक्षण सहकारी माझ्याकडून खूप चांगला सराव करवून घेत आहेत,’’ असे राष्ट्रकुल खेळांमध्ये टेबल टेनिसमध्ये अनेक सुवर्णपदके पटकावणाऱ्या मनिकाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 1:13 am

Web Title: childhood trainer sandeep gupta manica batra abn 97
Next Stories
1 धीरजला भारतीय संघात संधी
2 आशियाई नेमबाजी स्पर्धा : भारताला आठ पदके
3 भारताची दुहेरी परीक्षा!
Just Now!
X